पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मला क्रीडामंत्री केले. पण अजित पवार (Ajit Pawar) आमच्यासोबत आले आणि त्यांनी माझे क्रीडा खाते काढून घेतले, अशा स्पष्ट शब्दांत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढेच आपली खंत व्यक्त केल्याचे समजते.
अजित पवारांनी जुलैच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. ते शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर झालेल्या खातेवाटपात सर्वाधिक फटका गिरीश महाजन यांना बसला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खातेवाटपात भाजपची 6, तर शिंदे गटाची ३ अशी एकूण ९ खाती देण्यात आली. गिरीश महाजन यांच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ग्रामविकास मंत्रिपद देण्यात आले.