खरंतर कुणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा प्रश्न; अजित पवारांचा चिमटा

मुंबई : अमरावतीच्या एका खासदार अन् आमदार यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणण्यााचा त्यांचा हट्ट होता. खरंतर कुणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा हट्ट आहे. मात्र कायदा अन् सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी गृहखात्याची असते, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार याांनी राणा दांपत्याला चिमटा काढला आहे.

राणा प्रकरणावरून काल दिवसभर मुंबईत पार पडलेल्या प्रकरणावर भाष्य करताना पवार म्हणाले की, संविधानाने सर्वांना कायद्यानुसार मुभा दिल्या आहेत. मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी येऊ नका म्हणून सांगितलं जातं हे चुकीचं आहे.

तसेच त्यामुळे ‘मातोश्री’वर जे व्हायला नको होतं ते झालं आहे. त्याने वातावरण तापलं. राणा दाम्पत्याला पोलिसांनी त्यांना थांबा असंही सांगितलं होतं. मात्र त्यांनी ऐकंल नाही, असंही पवार यावेळेस बोलतााना म्हणाले.

दरम्यान रााणा यांनी मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय घमासनाला सुरवात झाली. शिवसैनिक गेली दोन दिवसांपासून मातोश्रीबाहेर तळ ठोकून आहे. तसेच काल राणा यांना पोलिसांना ताब्याा घेणं यानंतर किरीट सोमय्यांनी त्यांना भेटायला जाणं अन् त्यांच्या गाडीवर दगडफेकीची घटना घडणं, यामुळे काल दिवसभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

admin: