पुणे : (Ajit Pawar Group On Gopichand Padalkar) भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना, लबाड लांडग्याचं लांडग्याचं पिल्लू असं म्हटलं. शिवाय शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरही खालच्या भाषेत टीक केली होती.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) दिसतील तिथं कपडे काढून चोप देणार असं म्हणत, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं.
वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यानिमित्ताने महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचं ही पाहायला मिळालं.