पुणे : (Ajit Pawar On Chandrakant Patil) आई-वडीलांना शिव्या द्या पण, मोदी शहांना शिव्या देवू नका, असं वक्तव्य दोन दिवसांपुर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या विचारलेल्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आई-वडीलांवर असं वक्तव्य करणं म्हणचे, विनाशकाले विपरीत बुद्धी या मोजक्या शब्दात टिका केली आहे.
दरम्यान, अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांबरोबर शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, चंद्रकांत पाटलांसारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या मंत्र्यांनी अशा प्रकरची वक्तव्यं करु नये. त्यांना यंदा कमी दर्जाचं मंत्रिपद मिळालं आहे म्हणून कदाचित ते नाराज असतील,असा टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
राज्य सरकार सद्यस्थितीत महापालिका निवडणूक घेण्याच्या मूडमध्ये नाही. राज्य सरकारला या निवडणुका लांबणीवर टाकायच्या आहेत. पोट निवडणूक लावू शकतात मग महापालिकेच्या निवडणुका का लावत नाहीत, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.