“एकनाथ शिंदे चूक की बरोबर हे जनताच ठरवेल”

बारामती | Ajit Pawar On CM Eknath Shinde – एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. जवळपास दोन अडीच महिन्यांपासून त्यांच्या या बंडाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता याच संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेलं विधान चर्चेत आहे.

एकनाथ शिंदे चूक की बरोबर हे जनताच ठरवेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीमधील एक कार्यक्रमात बोलताना आजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेनेतला एक मोठा गट बाजूला काढला. या घटनेच्या मी खोलात जाणार नाही. लोकशाहीत अशा घटना होतच असतात. ते योग्य की अयोग्य हे सर्वसामान्य जनता निवडणुकीच्या माध्यमातून ठरवेल.

दरम्यान, शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर महत्त्वाचे मंत्री आणि आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. अखेर या शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Sumitra nalawade: