भुजबळांच्या अमृत महोत्सवाला मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री दांडी, अजित पवारांची टोलेबाजी, म्हणाले…

मुंबई : (Ajit Pawar On Devendra Fadnavis And Eknath Shinde) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१३ ऑक्टोबर) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला भुजबळ यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमंत्रण देवून त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे. अनेक वर्षे आपण अनेक मान्यवरांचे सत्कार पाहत आलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते आणि राजकीय मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेऊन तेही छगन भुजबळांबाबत बोलले असते, तर महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा अधिक ठळकपणे समोर आला असता.”

पुढे ते म्हणाले, “अशा एखाद्या घटनेने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत प्रतिमेला धक्का लागणार नाही याची खात्री माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे, खंत वाटत आहे, असं अजित पवार म्हणाले.

Prakash Harale: