अजित दादा ‘फुल्ल फॉर्म’मध्ये; जुनी कागदपत्र काढत, फडणवीस, दरेकरांची केली बोलती बंद!

नागपूर : (Ajit Pawar On Devendra Fadnavis) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे सुरू आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. राज्यातील प्रश्नांवरून भाजप-शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, विरोधकांकडून होणारी एकही चूक न सोडण्यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईबाबत केलेल्या एका वक्तव्यावरूनही विधानभवनात मोठा गदारोळ झाला. मात्र याच मुद्द्यावरून भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न आज राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून करण्यात आला.

‘मुंबई ही सोन्याचे अंडी देणारे शहर आहे, असे छगन भुजबळ बोलल्यावरून सत्तापक्षाने प्रचंड गदारोळ घातला. वास्तविक पाहता हा शब्दप्रयोग यापूर्वी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनीदेखी केला आहे, तसे पुरावा असलेली कागदपत्रे मी शोधून काढली आहेत,’ असा दावा अजित पवार यांनी केला. अजित पवारांच्या या दाव्यानंतर सत्ताधारी भाजपचे नेते काहीसे बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळाले.

भुजबळ यांच्या या वक्तव्याला भाजपच्या मनीषा चौधरी, योगेश सागर आदींनी आक्षेप घेतला. ‘मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा उल्लेख करणे हा मुंबईकरांचा अपमान असून तो आम्ही सहन करणार नाही. याप्रकरणी भुजबळ यांनी माफी मागावी’, अशी मागणी चौधरी यांनी केली. मात्र, अजित पवारांनी भाजप नेत्यांची जुनी काही वक्तव्य केलेली कागदपत्रेच काढली त्यामुळे फडणवीस आणि दरेकर यांची बोलती बंद झाली.

Prakash Harale: