सातारा : (Ajit Pawar On Eknath Shinde) आम्ही सरकारमध्ये अनेक वर्ष होतो, शरद पवार कृषीमंत्री असताना केंद्रातदेखील सत्ता होती. सगळ्या पंचायत समित्या देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. मात्र कधीही आम्ही सत्तेचा माज केला नाही. सत्ता असताना विरोधकांना देखील त्रास दिला नाही.
त्यामुळे सत्तेचा माज करू नका आणि केला तर आम्ही कधी सत्तेत येऊ हे कळणार सुद्धा नाही, अशा भाषेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्याना निशाणा साधला आहे. ते साताऱ्यातील मार्डीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीची कामे करु नयेत. कोणतीही चूक नसताना किंवा दोष नसताना सत्तेत आहोत म्हणून कोणाला त्रास द्यायचा हा प्रकार शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील यावेळी अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय.