प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी एकत्र येणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

मुंबई | Ajit Pawar – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात सोमवारी (5 डिसेंबर) एक बैठक पार पडली. या दोघांमध्ये युतीच्या अनुषंगानं पहिली बैठक झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. तसंच ही चर्चा सकारात्मक झाली असून वंचित आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. दरम्यान, वंचितला महाविकास आघाडी समाविष्ट करून घेणार का? यावर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“जे समविचारी पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि भाई जगताप यांना विचारणा केली आहे. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मी आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी याआधी शिवसेनेबरोबर युती करण्याची वंचित आघाडीची तयारी असून त्याबाबत प्रकाश आंबेडकर व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन बैठका होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाल्यानं युतीच्या चर्चांना आता वेग आला आहे.

Sumitra nalawade: