पवारांना मोठा झटका! फसवून सही घेतली म्हणणारे आमदार पुन्हा अजित पवारांच्या गोटात दाखल

मुंबई : (Ajit Pawar On Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शपविधीच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील एका आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आज मंगळवार दि. 11 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे अजित पवार यांना भेटण्याकरता देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार पक्षाची बैठक बोलावली होती त्या बैठकीत किरण लहामाटे हे उपस्थित होते. आज ते अजित पवार यांची भेट घेण्याकरता आले आहेत.

अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी डॉ. लहामटे उपस्थित होते. त्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांवर त्यांनी सह्या देखील केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी लहामटे शरद पवार यांच्याकडे परतले. मुंबईतील सभेला त्यांनी उपस्थितीही लावली त्यामुळे पुन्हा ते कोणाला पाठिंबा देणार याबाबत याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. आपल्याकडून फसवून सह्या करून घेतल्याचे त्यांनी म्हंटलं होतं. तेव्हापासून लहामटे यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आज कुठे तरी अजित पवार गटाल यश आल्याचे दिसून आले आहे.

Prakash Harale: