“दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्याशिवाय…”, अजित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई | Ajit Pawar On Shinde- Fadanvis Government – राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झालं आहे. याच संदर्भात आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. याच दरम्यान सरकारकडे बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? असा सवाल करत दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्याशिवाय राज्यात कोणताच निर्णय होत नाही असा टोला अजित पवारांनी शिंदे- फडणवीस सरकारवर लगावला आहे.

राज्यातील सरकारने तात्काळ विधिमंडळाचं अधिवेशन बोलावलं पाहिजे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला असा सवाल करत मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील जनतेकडं लक्ष नाही, असं अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या हातात काहीच नसून त्यांना केंद्रातून हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय कोणताच निर्णय घेतला जात नाही असं मला वाटतं.

Sumitra nalawade: