मुंबई : (Ajit Pawar On State Governments) सध्या राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात फार काही राहिलेलं दिसत नाही. दिल्लीत वारी केल्याशिवाय राज्य सरकारने तीन आठवड्यात एकही निर्णय घेतला नाही. राजकीय भूकंप करणाऱ्यांनी राज्य ताब्यात घेतलंय ना, जे काही प्रश्न आहेत ते सोडवा ना मग. एकनाथ शिंदेंना घेऊन समाधान झालं नाही का? छातीवर दगड ठेवून का होईना? सरकारमध्ये येण्याची भूक होती ती भागवली ना, असं टीकास्त्र अजित पवारांनी मुंबई येथील पञकार परिषदेत सरकारवर सोडलं.
दरम्यान, अतिवृष्टी सुरु झाल्यापासून राज्यात कित्येक भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मराठवाड्यात, विदर्भात तर हे प्रमाण जास्तीचं पाहायला मिळत आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी तातडीनं अधिवेशन बोलावलं पाहिजे. आमदारांना आपल्या मतदारसंघात फिरल्यानंतर जे काय पाहायला मिळालं ते मांडण्याचं माध्यम विधिमंडळ आहे. हे सरकार अधिवेशन घेत नाही. इतकं बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला कुणी अडवलं आहे, मंत्रिमंडळ बैठक घ्यायला कुणी अडवलं आहे, असा सवाल अजित पवार यांनी केला.
अमुक फुटणार, तमूक फुटणार अशा चर्चा सातत्याने करत आहेत. बहुमत दिलंय तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा ना? की अजून बहुमताची भूक भागली नाही? अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. याच प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार काहीसे संतापलेले पाहायला मिळाले. अजितदादांनी दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचं खंडन केलं