पुणे : नुकत्याच झालेल्या ऐका मुलाखतीत भाजचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यावर निशाणा साधला होता शेलार म्हणाले होते कि, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या भूमिका बदलतात हे भाजपला चांगलंच माहिती आहे.२०१७ मध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन होणार होतं. शेलारांच्या या विधानाला राज्याचे उपमुख्यामंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उलट प्रश्न विचारला आहे.
अजित पवार यांनी सवाल केला कि, २०१७ मध्ये काय झालं ते तुम्ही आज आम्हला सांगताय? ही गोष्ट २०१७ सालीच सांगायची ना, सध्या आपण २०२२ मध्ये आहोत, तुम्ही इतकी ५वर्ष का थांबला ? मागच्या गोष्टी आता काढून काहीच साध्य होणार नाही. असा प्रश्न पवार यांनी उपस्तिथीत केला तसंच सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्यावर चर्चा होणे गरजेची असल्याचंही अजित पवार म्हणले. २०१२,२०१७ ला काय झालं हे ऐकण्यात कोणालाही रस नाही असा टोला हि त्यांनी शेलारांना लगावला .