“धरणाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर एक गोष्ट ठरवली”; अजित पवारांनी सांगितला तो खास किस्सा!

पुणे – Ajit Pawar on Dam Statement | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना पाण्याच्या प्रश्नावरून धरणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आज पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना या प्रसंगाची आठवण करून देताना एक खास किस्सा सांगितला.

मी बोलताना दहा वेळेस विचार करून बोलतो. पाठीमागे एकदा चुकलो तेव्हा सकाळी सात ते रात्री सात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी बसलो आता नाही चुकायच, आता नाही चुकायच अस म्हणत बसलो होतो. तेव्हापासून चुकलो नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

कितीही टाळ्या वाजवा, खूश करा तरी ही मी घसरणार नाही. बोलताना टाळ्या पडायला लागल्या की हळू हळू घसरायला लागतो. पण मी माझ्या दुसऱ्या मनाला सांगतो घसरायचं नाही, असं अजित पवार म्हणाले.

RashtraSanchar: