४० गावं कर्नाटकात नेण्याच्या दाव्यावरून अजित पवारांची फडणवीसांना साद! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

मुंबई : (Ajit Pawar Replied on Basawraj Bommai’s Statment Over Maharashtra – Karnatak Border Conflict) महाराष्ट्राच्या सीमेवरील जत (Maharashtra Border Jat) तालुक्यातील ४२ गावे कर्नाटक राज्यात येण्याच्या तयारीत आहेत. जत तालुक्यातील ४२ गावांनी पाणी प्रश्नासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून पाणी मिळणार नसेल तर कर्नाटकात जाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करून ठरावही केला आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई (Basavaraj Bommai, CM Karnatak) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाला सीमाभागातील मराठी भाषकांनी (Marathi Speakers) जोरदार विरोध केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधक या प्रश्नावरून कर्नाटक सरकारच्या विरोधात एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. तर कर्नाटकातील काही गावं महाराष्ट्रात येणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis On Basavaraj Bommai’s Statement) यांनी सांगितलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. ट्वीट करत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याचं वक्तव्य निंदनीय असून आम्ही त्यांचं वक्तव्याचा निषेध करत असल्याचं म्हटलं आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी बेजबाबदार, प्रक्षोभक वक्तव्ये महाराष्ट्र सहन करणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार?
“महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या जत आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील गावांवर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं वक्तव्य निंदनीय असून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. धिक्कार करतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचे असून त्यांनी अशी वक्तव्ये तत्काळ थांबवावीत. केंद्र सरकारनं याप्रकरणात लक्ष घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आवरावं. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी बेजबाबदार, प्रक्षोभक वक्तव्ये महाराष्ट्र सहन करणार नाही. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातल्या ८१४ मराठी भाषक गावं महाराष्ट्रात येणं हा खरा मुद्दा आहे. ही गावं महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीनं लढेल.” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Dnyaneshwar: