फडणवीस निघून गेले अन् अजित पवार बसले उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर; वाचा सविस्तर

पुणे : (Ajit Pawar sat on chair of Deputy CM Devendra Fadnavis) गुरुवार दि. 05 जानेवारी रोजी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेचा उद्धाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. मात्र, या कार्यक्रमा दरम्यान एक वेगळीच गोष्ट दिसून आली. उद्धाटनानंतर अजित पवार उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीत बसलेले दिसून आले. अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे बघून अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

दरम्यान, या सोहळ्यादरम्यान रंगमंचावर मान्यवरांसाठी त्यांच्या नावाचे लेबल लाऊन राखीव खूर्च्या ठेवण्यात आल्या होत्या दुपारी साडेचार वाजता उद्धाटन सोहळा पार पडणार होता. मात्र, कार्यक्रम वेळेत सुरु न झाल्यामुळे क्रीडा व युवक सेवाचे सुहास दिवसे यांना अजित पवार हे वारंवार घड्याळ दाखवून उदघाटनासाठी वेळ होत असल्याचं सुचवत होते. दरम्यान, स्वागत गीत झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमचं उदघाटन करत मशाल पेटवून शुभारंभ केला.

पुढील कार्यक्रमाला वेळ होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेले. फडणवीस गेल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शेजारी ठेवण्यात आलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर येऊन बसले. अजित पवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली खूर्ची रिकामीच होती.

काही वेळानंतर अजित पवार भाषण करण्यासाठी उठले. तेवढ्यात बालेवाडी क्रीडा संकुलनातील दुसऱ्या एटीपी चॅम्पियनशिप पारितोषिक समारंभाला गेलेले फडणवीस परतले आणि आपल्या खुर्चीवर बसले. काही वेळासाठी का होईना मात्र, अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खूर्चीवर बसलेलं पाहून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Prakash Harale: