पुणे | राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकीत अजित पवार यांना भाजपने धक्का दिला आहे. अजित पवार यांचे 24 वर्षांपासून वर्चस्व राहिलेल्या बाजार समितीत भाजप पुरस्कृत पॅनल विजयी झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरसी झाली. आता अजित पवार यांचे विरोधक हवेली बाजार समितीत अध्यक्ष झाले आहे.
कोणाची अध्यक्ष म्हणून निवड
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी आणि भाजपची एकहाती सत्ता आली. राष्ट्रवादी बंडखोर दिलीप काळभोर यांची सभापतीपदी निवड झाली. तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलला धक्का देत बाजार समितीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.