“…म्हणून अजित पवार मुख्यमंत्री नाहीत”; पाहा शरद पवार असं का म्हणाले?

नाशिक | आज शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिक (Nashik) दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे बोललं जात आहे, त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपासून आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) जाहीरपणे असं वक्तव्य देखील केले आहे, की अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यामुळं कामाला लागा. यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री पदी आवडतील मात्र शेवटी संख्या असली पाहिजे, आज आमच्याकडे संख्या नाही, आमच्याकडे संख्या असती तर सगळ्या पक्षांना विचारात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाला खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे.

आमच्याकडे संख्या असती तर….

मोदी (Narendra Modi) महाराष्ट्रात येण्याच कारण म्हणजे मुंबई मनपाची निवडणूक, हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा. तसेच नाना पटोलेंनी (Nana Patole) राजीनामा देऊन एक वर्ष झाला, आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतले नाही, एवढीच व्यथा पण आता तो विषय संपला असल्याचे पवार म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित दादा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवत आहेत. यावर पवार म्हणाले की, अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. आज आमच्याकडे शक्ती नाही, त्यामुळे सध्या शक्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.

Dnyaneshwar: