मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी सभागृहात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
मला एका गोष्टीचं खूप कौतुक आहे. राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तर त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या खूप जवळ जातात. शिवसेनेत आदित्य ठाकरेंना जवळ केलं त्यानंतर राष्ट्रवादीत आल्यावर त्यांनी मला आपलंसं केलं. आता भाजपमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीसांना यामध्ये त्यांनी कुठलीच हयगय केली नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांना आपलंसं करून घ्यावं, नाहीतर त्यांचं काही खरं नसल्याचं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचं काम केलंय. राहुल नार्वेकरांकडून सगळ्यांना न्याय मिळेल आणि विकासाचं चाकं अधिक गतीमान होतील, असंही पवार म्हणाले.