बंडाच्या चर्चांवर अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “कारण नसताना माझ्याबद्दल…”

मुंबई | Ajit Pawar – महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचं म्हटलं जातंय. काल (17 एप्रिल) अजित पवारांनी त्यांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून ते मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. यासंदर्भात आता स्वत: अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, कारण नसताना माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचं काम होत आहे. तुम्ही माझ्याबाबत ज्या बातम्या पसरवत आहात त्या सर्व गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही.

अजित पवारांनी विधानभावनात आमदारांची बैठक बोलावली होती या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्व आमदार विविध कामांसाठी आले होते. माझी कामं देखील होती. सर्व आमदार कामासाठी भेटले होते, त्यामुळे याचा अर्थ वेगळा काढू नका.

Sumitra nalawade: