पाथर्डी : (Ajit Pawar’s warning to Chief Minister Eknath Shinde on cabinet expansion) शिंदे-फडणवीस सरकारला विविध मुद्द्यांवरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चांगलंच धारेवर धरलं. मंत्रिमंडळ विस्तारावरुनही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घणाघात केला. तर मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्यांना आमदारांना त्यांनी डिवचलं आहे.
पवार म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाला देऊ असं सांगत आहेत. पण मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर आहेत ते आमदारही निघून जातील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
अवकाळी पावसानं राज्याचं वाटोळ केलं आहे. निसर्ग कधी कोपलं सांगता येत नाही, अशा वेळी आपण शेतकऱ्याच्या पाठिशी उभं रहायला पाहिजे याबद्दल तर हो लोक बोलायला तयार नाहीत. अशा पद्धतीचं सरकार आज सत्तेत आलेलं आहे. त्यांनायाबाबत विचारलं ते फक्त म्हणतात आम्ही करु, आम्ही देऊ काही काळजी करु नका. परंतू तशा पद्धतीचा निर्णय काही होत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला धारेवरही धरलं.