मुंबई | Akanksha Dubey Suicide – प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) काल (26 मार्च) उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील हाॅटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तिनं वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिचं आयुष्य संपवलं आहे. तिच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच तिच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होताना दिसत आहेत. (Akanksha Dubey Suicide)
आकांक्षा दुबेच्या मृत्यूबाबत नुकत्याच दोन मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत. आकांक्षा आत्महत्या करण्यापूर्वी काही तास आधी इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळी ती खुप रडताना दिसली. आकांक्षाचा रडतानाचा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी रेकॉर्ड केला होता. तसंच तिचा हा काही सेकंदांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
तसंच आणखी एक माहिती समोर आली आहे. आत्महतेच्या आदल्या रात्री आकांक्षाला सोडण्यासाठी एक व्यक्ती आला होता. तो व्यक्ती तिच्या खोलीतही गेला होता. त्यामुळे आता त्या मुलावर संशय बळावला जात आहे. हा मुलगा आकांक्षाच्या खूप जवळचा असल्याचंही सांगण्यात येत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा शनिवारी (25 मार्च) रात्री वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचं सांगून हॉटेलमधून बाहेर पडली. त्यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक मुलगा तिला ड्रॉप करण्यासाठी आला आणि तो तिला सोडण्यासाठी तिच्या खोलीत गेला. तो मुलगा आकांक्षासोबत तिच्या खोलीत जवळपास 17 मिनिटे थांबला होता आणि तो बाहेर आल्यानंतर आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा परत उघडलाच नाही. त्यामुळे आता पोलीस त्या मुलाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.