आकाश ठोसरने शिव ठाकरेबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “त्याच्यासोबत मला…”

मुंबई | Akash Thosar – सध्या अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) चांगलाच चर्चेत आहे. त्याचा ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आकाश ठोसर सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच या चित्रपटाच्या निमित्तानं आकाशने एका मुलाखतीत बिग बाॅस फेम शिव ठाकरेबाबत (Shiv Thakare) केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

आकाशसोबत शिव ठाकरेही बिग बाॅसमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. सध्या सोशल मीडियावर शिवचीच चर्चा होताना दिसत आहे. शिवचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. दरम्यान, आकाशने ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने हंच मीडिया या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला शिवबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आकाशने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

“शिव आणि तू मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेत असणारे दोन चेहरे आहात. तर तुला शिवबरोबर काम करायला आवडेल का?”, असा प्रश्न आकाशला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर आकाश म्हणाला की, “शिव आणि मी एकदा भेटलो आहोत. आम्ही एकत्र मॅच बघायला गेलो होतो. आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो. त्यामुळे मला शिवबरोबर काम करायला आवडेल.” आकाशनं केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं असून चाहतेही या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Sumitra nalawade: