मुंबई | Akshay Kumar Honored By Income Tax Department – बाॅलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar). तो प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तसंच तो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. आता देखील तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षयचा आयकर विभागाकडून (Income Tax Department) सन्मान (Honored) करण्यात आला आहे.
सध्या अक्षय कुमार इंग्लंडमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पिंकव्हिला या संकेतस्थळानुसार अक्षयला एक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. तो हिंदी चित्रपट उद्योगात सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. त्यामुळे त्याच्या वतीने त्याच्या टीमने हे सन्मानपत्र स्वीकारले आहे. गेल्या पाच वर्षांत त्याचा सतत भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश होतो.
दरम्यान, अक्षय इंग्लंडमध्ये जसवंतसिंह गिल यांच्या बायोपिकचं चित्रीकरण करत आहे. तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतू शकतो. त्यानंतर तो आपला आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan) चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यात त्याची सहकलाकार म्हणून अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आहे.