अक्षय कुमारच्या ‘त्या’ कृतीनं कपिलच नाय तर, पूर्ण सेटवरील लोक भावुक

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या रविवारी प्रसारित होणार्‍या या शोच्या एपिसोडमध्ये खूप नाट्य पाहायला मिळणार आहे. होय, या स्पेशल एपिसोडमध्ये अक्षय कुमारसोबत नोरा फतेही, दिशा पटानी, मौनी रॉय आणि सोनम बाजवा एकत्र दिसणार आहेत. या शोमध्ये अक्षय कुमार जेव्हाही गेस्ट म्हणून येईल तेव्हा धमाका होणार हे नक्की, पण हा भागही थोडा भावूक होणार आहे.

आई आणि मुलाचे हे प्रेमळ नाते पाहून अक्षय कुमारला दीड वर्षापूर्वी निधन झालेल्या आईची आठवण येते. अक्षय शोमध्ये बसून आपल्या आईला कसा मिस करतोय हे सांगताना दिसणार आहे. मग त्याने कपिलच्या आईला स्टेजवर बोलावण्याचा विचार केला. मी नेहमी लोकांना सांगतो की आईच्या चरणी तुम्हाला सर्व काही मिळू शकते.

‘द कपिल शर्मा शो’चा हा एपिसोड खूपच भावूक असणार आहे. कपिलची आई तिच्या मुलाची अनेक गुपिते उघड करणार आहे, तर अक्षय कुमार त्याच्या आईबद्दल पूर्णपणे भावूक झालेला दिसेल. अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात इमरान हाश्मी नुसरत भरुचा आणि डायना पेंटीसारखे कलाकार दिसत आहेत.

Prakash Harale: