अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात आलियाच्या लेकीची चर्चा; गोंडस राहा कपूरचा व्हिडीओ व्हायरल!

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding : गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी (Anant Amban) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचं प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहे. १ मार्च ते ३ मार्च दरम्यान या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी हॉलीवूडपासून, बॉलीवूड, दाक्षिणात्य कलाकार उपस्थित राहिले आहेत. याशिवाय उद्योग जगतातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच रणबीर कपूर व आलिया भट्टची लेक राहा कपूरच्या क्यूट व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मिडियावर गोंडस राहा कपूरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, आलिया भट्ट राहाला कडेवर बसवून अनंत अंबानींशी भेट करून देताना दिसत आहे. यावेळी मायलेकीने मॅचिंग कपडे घातलेले पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत पुन्हा एकदा राहाचा क्यूट अंदाज दिसत आहे. राहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आलिया ही एक आई आहे, यावर विश्वास बसत नाहीये. ती स्वतः एका बाळासारखी दिसते’, ‘अनंत अंबानी खूप चांगल्या मनाचे व्यक्ती आहेत’, ‘ही छोटी आलिया किती क्यूट आहे’, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

admin: