आलिया दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत; ‘Heart Of Stone’चा ट्रेलर रिलीज!

Alia Bhatt Heart Of Stone Trailer : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) हिंदी सिनेमांमध्ये अफलातून काम करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. आलिया आता हॉलिवूडमध्येही नाव कमावण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड सिनेमाचा (Alia Bhatt in Hollywood Movie) ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आलियाचा हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये (Alia Bhatt in Heart of Stone) गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे.

‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमात आलिया भट्ट खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर गैल गैडोट आणि जेनी डॉर्नन हे हॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात आलिया गैल गैडोटच्या गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. दिलेलं मिशन पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करताना आलिया दिसणार आहे.

आलियाने शेअर केला ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर (Alia Bhatt Shared Heart Of Stone Trailer)

‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमातील डायलॉग खूपच दमदार आहेत. आलियाने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत तिने लिहिलं आहे,”हार्ट ऑफ स्टोन…ऑगस्ट 11… नेटफ्लिक्स”. ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टॉम हार्परने सांभाळली आहे.

Dnyaneshwar: