Alia Bhatt On Social Media Trollar : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया ही तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आपल्याला जे वाटते ते थेटपणे सांगणाऱ्या आलियावर नेटकरी नेहमीच पातळी सोडून टीका करताना दिसतात. अशातच आता तिच्यावर भावनिक टीक करण्यात आली आहे. त्यामुळे आलियाच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
एकानं मला ऐकवलं होतं की, तुम्ही कधीही महान अभिनेत्री किंवा महान आई यापैकी काहीही होऊ शकत नाही. मला ज्यावेळी ती प्रतिक्रिया मिळाली तेव्हा मी विचार केला की, त्यानं काहीही फरक पडत नाही. आपण प्रत्येकवेळी महानतेला खूपच महत्व देतो. तिथे घोळ होतो. मला वाटतं तुम्ही तुमचे काम योग्य पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे करा. बाकी त्याचे जे फळ मिळायचे ते मिळतेच.
मला जेव्हा माझ्या आईपणावरुन कुणी बोललं होतं, किंवा जो काही सल्ला दिला होता त्यामुळे मी खूपच नाराज झाले होते. मला वाईट वाटले होते. आपल्याला कुणी काहीही सुनावते आपण ते ऐकतो. पण कुणाचे कितपत ऐकायचे हेही तुम्हाला ठरवता यायला हवे. असे मला वाटते. प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकता येते. तुम्ही त्या गोष्टीचा कशादृष्टीनं विचार करता हेही महत्वाचे आहे. अशा शब्दांत आलियानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.