मुंबई | Narendra Razdan Passed Away – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टवर (Alia Bhatt) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र राजदान हे आजारी होते. तसंच मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं. अखेर आज (1 जून) उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आजोबांची प्रकृती खराब होताच आलिया भट्टने तिचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर ती थेट ब्रीच कँडी रूग्णालयाकडे रवाना झाली होती. तसंच तिनं तिचा विदेशी दौराही रद्द केला होता.