मुंबई | ‘काॅफी विथ करण’ या शोमध्ये करणचे गेस्ट म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंगने हजेरी लावली होती. या चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आहे. यावेळी आलियानं रणबीरसोबत तिची पहिली भेट आणि त्यावेळी झालेला रोमान्स याविषयीचा खुलासा केला आहे. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबतच्या पहिल्या रोमान्सचा पूर्ण किस्सा ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सांगितला. आलिया आणि रणबीरच्या रोमँटिक नात्याची सुरुवात नववर्षाच्या संध्याकाळी झाली होती. त्यावेळी दोघंही ‘ब्रह्मास्त्र’च्या वर्कशॉपसाठी इस्रायलला जात होते आणि ते दोघंही तेल अविवच्या फ्लाइटमध्ये होते. करण जोहरच्या चॅट शोमध्ये आलियानं त्यावेळच्या आठवणी सांगितल्या आहेत.
यावेळी आलिया म्हणाली, “आम्ही दोघंही ब्रह्मास्त्रच्या वर्कशॅापसाठी तेल अविवला जात होतो. आम्ही फ्लाईटमध्ये होतो. मला आठवतं मी रणबीरला आत येताना पाहिलं आणि मग तो येऊन माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. मी खूप उत्साहित होते. आम्ही एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवू असं वाटत होतं. पण पुढच्याच क्षणाला तो माझ्या पुढच्या सीटवर जाऊन बसला. माझ्या बाजूच्या सीटचा काहीतरी प्रोब्लेम होता ज्यामुळे त्याला पुढच्या सीटवर बसवण्यात आलं. त्यावेळी मला वाटलं हे सगळं माझ्यासोबतच का होत आहे. पण नंतर ती सीट ठीक करण्यात आली आणि रणबीर पुन्हा माझ्या बाजूला येऊन बसला.”
“जेव्हा आम्ही दोघं नंतर एकमेकांच्या बाजूला बसलो होतो तेव्हा रणबीरनं मला सांगितलं ती त्यालाही पुढे बसण्याचा कंटाळा आला होता. त्यालाही माझ्या बाजूला बसायचं होतं आणि त्याच वेळी सीट खराब झाल्यानं त्याला राग आला होता.” असं आलियानं सांगितलं.