मुंबई – Dhananjay Munde on RSS | ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निकास दिल्यापासून विरोधी पक्ष भाजप (BJP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde on RSS) यांनी आरएसएसवरून (RSS) राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
आम्ही आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. आज आम्ही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको या ठरावाचं अभिनंदन केलं. तसाच ठराव रेशीम बागेतील (Reshim Bag) संघाच्या कार्यकारिणीमध्ये या देशातील सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे, असा ठराव करावा आणि मग आमच्यावर बोला, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेशच्या निकालाचे विरोधक दाखले देतात मग सत्ता भाजपने मागील पाच वर्षात का निर्णय घेतला नाही?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुरावे सादर झाले आणि आमच्या काळात निकाल लागला. भाजपने जनाची नाहीतर मनाची लाज बाळगावी, असं म्हणत धनंजय मुंडेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.