पुणे : अखिलेश चव्हाण, विहान पंडीत, शुभ नहाटा, आरूश पोतदार, मिहीर काळे, लव परदेशी, आरव मुळे, अगस्त्या चतुर्वेदी, अनिश वडनेरकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी विरूध्द विजय मिळवत अखिल भारतीय चॅम्पियन सिरीज १२ वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. सोलारीस क्लबच्यावतीने कोथरूड येथील त्याच्या टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अखिलेश चव्हाण याने सिद्धार्थ कोंढाळकर याचा ९-६ पराभव केला. विहान पंडीत याने रौनक सेठी याचा ९-६ गुणांनी पराभव करून पात्रता फेरीच्या दुसºया चरणात प्रवेश केला. शुभ नहाटा याने वेदांत जोशी याचा ९-७ असा पराभव केला. आरूश पोतदार याने नील बोंद्रे याचा ९-२ गुणांनी पराभव करून आगेकूच केली. मिहीर काळे याने रूद्र पटवर्धन याचा ९-४ तर, लव परदेशी याने लेशा नायडू याचा ९-५ गुणांनी पराभव केला. आरव मुळे याने नमन शहा याचा ९-५ असा तर, अगस्त्या चतुर्वेदी याने हिमांशु देसाई याचा ९-४ असा पराभव करून आगेकूच केली. अनिश वडनेरकर याने सुमेर मेधी याचा ९-० असा सहज पराभव करून आगेकूच केली.
निकाल (१२ वषार्खालील गट :
पात्रता पहिली फेरी):
अखिलेश चव्हाण वि.वि. सिद्धार्थ कोंढाळकर ९-६; विहान पंडीत वि.वि. रौनक सेठी ९-६; शुभ नहाटा वि.वि. वेदांत जोशी ९-७; आरूश पोतदार वि.वि. नील बोंद्रे ९-२; राघव अगरवाल वि.वि. अवनीश परब ९-०; अर्णव पांडे वि.वि. मोहम्मद रायन ९-१; वेद परदेशी वि.वि. इशान जगताप ९-१; अभिनव महामुनी वि.वि. रूद्रप्रताप चव्हाण ९-४; मिहीर काळे वि.वि. रूद्र पटवर्धन ९-४; लव परदेशी वि.वि. लेशा नायडू ९-५; आशिरीत माजी वि.वि. साहील मोडक ९-१; अनिश वडनेरकर वि.वि. सुमेर मेधी ९-०; आरव मुळे वि.वि. नमन शहा ९-५; अगस्त्या चतुर्वेदी वि.वि. हिमांशु देसाई ९-४; विवान मल्होत्रा वि.वि. अवधुत निखाते ९-२; विश्?वतेज देशमुख वि.वि. जय जाधव ९-३.