‘आपल्या हिताच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील’; उपमुख्यमंत्र्यांचे ओबीसीला आश्वासन

नागपूरDevendra Fadanvis On OBC : “मी निवडून येत असलेल्या नागपूर मतदार संघात ओबीसी समाजाची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्यामुळेच मी निवडून येतो. त्यांनीच मला घडवले आहे.” असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते दिल्लीमध्ये राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनात बोलत होते.

‘महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करेल. २०१४ ते २०१९ मध्ये मी मुख्यमंत्री असताना ओबीसी संदर्भात २२ पैकी 21 निर्णय घेतले. आमच्या काळात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची देखील निर्मिती केली होती’ असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधानांची कोणतीही जात नसते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसीतून येतात. सध्या केंद्रातील ४० टक्के मंत्री हे ओबीसी समाजातून येतात. असा उल्लेखही फडणविसांनी यावेळी केला. अधिवेशनाच्या व्यासपीठावरून होणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी होईल तितक्या लवकर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि ओबीसीच्या हिताच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू अशी ग्वाही देखील फडणविसांनी दिली.

Dnyaneshwar: