चिखली : गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या स्पाईन रोड बधितांना अखेर न्याय मिळाला असून रस्ता बाधित कुटुंबांना पर्यायी भूखंड वाटपाला सुरू झाली आहे. आ. महेश लांडगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांच्या समक्ष दुय्यम नोंदणी कार्यालय २४, निगडी प्राधिकरण या ठिकाणी प्रातिनिधीक स्वरुपात १२ दस्त नोंदविण्यात आलेले आहेत. यापुढे इतर दस्त तातडीने नोंदविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
त्याबाबतच्या सूचना आमदार लांडगे यांनी अधिकारी वर्गास केलेल्या आहेत. दस्त नोंदणी सुरु झाल्यामुळे अनेक दिवसापासून बाधितांची गैरसोय झालेली दुर होणार आहे. ज्या बाधितांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही, त्यांनी तातडीने पुर्तता करुन देणेत यावी. जेणेकरू एकत्रितपणे सदर ठिकाणी विकासाची कामे करणे किंवा बांधकामाकरीता पुढील कामकाज करणेकामी सोयीचे होणार आहे. याबाबतही सर्वांना आवाहन करण्यात येईल, असे आमदार लांडगे म्हणाले. मौजे तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक येथून जाणा-या स्पाईन रस्त्यामधील बाधित रहिवाशांना भुखंड देण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.