Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पाः2 चित्रपटाचा एक खास व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पुष्पा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये गेलेला दिसला. आता नुकताच अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर त्याचा पुष्पा-2 चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील अल्लू अर्जुनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्याचसोबत आता या सीक्वेलसाठी अल्लू अर्जुनने घेतलेल्या फीबाबत माहिती समोर आली आहे.
पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे. दुसऱ्या भागाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार झाला आहे. त्याला आठ गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे तो जिवंत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याच्यामुळे कशाप्रकारे एका मुलाला जीवनदान मिळालं, तर दुसऱ्याला राहण्यासाठी घर मिळालं, असं ते सांगू लागतात. एकीकडे पुष्पाचे चाहते त्याच्या नावाने घोषणा देत असतात, तर दुसरीकडे पोलीस त्यांच्यावर लाठीमार आणि पाण्याचा वर्षाव करतात. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे ‘पुष्पा कुठे आहे?’ ‘पुष्पा 2’ या वर्षाच्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे.