अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट; काय आहे ‘पुष्पा 2’चा संबंध?

Pushpa 2 : The Rule | अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘पुष्पा : द रुल’चे शूटिंग करत आहे. सुकुमार दिग्दर्शित हा सिक्वेल या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये झळकणार आहे. आता, पुष्पा 2 ची पहिली झलक 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या पसरत आहेत. अल्लू अर्जुनचे चाहते 8 एप्रिलची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण त्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो. त्याच्या वाढदिवशी पुष्पा 2 ची झलक प्रदर्शित झाली तर अल्लू अर्जुन आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा दुहेरी धमाका असेल.

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन राजस्थानमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसला होता. परंतु आता अल्लू अर्जुन पुन्हा पुष्पा 2 च्या शुटींगच्या कामात व्यस्थ झालेला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी पुष्पा 2 ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची तयारी करत आहेत. 8 एप्रिल रोजी, अभिनेता 41 वर्षांचा होत आहे, तर पुष्पा 2 निर्माते त्याचा हा वाढदिवस अशा प्रकारे खास बनवण्याच्या तयारीत आहेत. सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित पुष्पा 2 हा दोन भागांचा अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहेत.

Dnyaneshwar: