नवी दिल्ली : अल्ट न्यूज फॅक्ट चेक वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर २०१८ च्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटक करण्यात आलेले आहेत. आता पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांनी दिल्लीतील पटीयाला न्यायालयात जमीन अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे जुबेर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जुबेर यांच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी एफआयआरमध्ये परदेशी नियमन कायद्यांतर्गत नवीन कळमं दाखल केली असल्याने पोलिसांनी जुबेर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याचबरोबर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे जुबेर यांच्या अडचणी अजून वाढल्या आहेत.
जुबेर यांचे अल्ट न्यूज चॅनेल हे एका एनजीओ मार्फत चालवले जाते. त्या एनजीओला पाकिस्तान, सिरीया, युएई, कतार या देशांतून निधी मिळतो अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. दरम्यान, अल्ट न्यूज त्याच भारतीय लोकांकडून निधी स्वीकारते, जे विदेशात राहतात पण त्यांचे भारतीय बँकेत खाते आहेत. अशी माहिती जुबेर यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.