मुंबई : (Amar Deshmukh On Sambhajiraje Chatrapati) दोन महिन्यापुर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्यात नवीन शिंदे-फडणवीस सरकार स्थापनं झालं. यामुळे मराठा समाजाच्या अशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मराठा आरक्षणातून निवड झालेल्या मात्र, गेली काही वर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेतल्यानं त्यांचा नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, या गोष्टीची जाण ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार देखील मानले होते. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणावर एक बैठक पार पडली. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आम्हाला बैठकीला बोलावले होते. मग सरकारने आमचं ऐकून घ्यायची तयारी दाखवली पाहिजे होती. मात्र, या बैठकीला उपस्थित असणाऱ्या समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांनी एक शब्दही काढायचा नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावून सांगितलं होतं. कालचा एकंदरित प्रकार बघून असं दिसतंय संभाजीराजे सरकारला मॅनेज झाले आहेत की काय? खळबळजनक आरोप मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.
“मुख्यमंत्री शिंदेंना बडव्यांनी घेरले असल्याचे दिसून येत आहे, मराठा आरक्षणाची बैठक बोलावली तर त्यामध्ये शेवटच्या घटकालाही आपले मत मांडता आले पाहिजे. अशा शब्दांत ‘शिवछत्रपती संघटने’चे नेते अमर देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या बैठकीला फक्त पहिल्या फळीतील नेत्यांना आणि भाजपचे जवळचे असलेल्यांना बोलावण्यात आलं होतं. आरक्षणाच्या बैठकीच्या नावावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम करण्यात आलं असल्याचा आरोप अमर देशमुख यांनी केला आहे”.