“दिल्लीचे पातशाह हैद्राबादला आल्याने मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहनाची वेळ बदलली”; अंबादास दानवेंचा आरोप

औरंगाबाद Marathwada Muktisangram Din : आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होत आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांतील अनेक नेते मराठवाड्यात पोहोचलेले आहेत. तर, दुसरीकडे हैद्राबादला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आलेले आहेत. दरम्यान, ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांच्या भेटीसाठी जायचे असल्याने मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहिदांना अभिवादन करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला’ असा आरोप विरोधकांनी केला आहे.

“दिल्लीचे पातशाह हैद्राबादला येणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहिदांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेत बदल केला.” असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. “प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहणाच्या वेळा ठरलेल्या असतात. ते कोणालाही वाटलं म्हणून बदलू शकत नाहीत. परंतु या नियमाला छेद देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ध्वजारोहण आणि शहिदांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाची वेळ दरवर्षी सकाळी ९:०५ मिनिटांनी असते. मात्र, मुख्यमंत्र्यांना हैद्राबादला अमित शाह यांना भेटायला जायचे असल्याने हा कार्यक्रम ७ वाजताच घेण्यात आल आहे. तसा त्यांचा जगही बदलण्याचा घाट होता. मात्र, आम्ही तसं करू दिलं नाही.” अशी टीका अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

Dnyaneshwar: