‘अब्दुल सत्तार ही विकृती’, अंबादास दानवेंची घणाघाती टीका; अमृता फडणवीसांचाही समाचार!

मुंबई : (Ambadas Danve On abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वर्षा बंगल्यावरील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खाजगी स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ केल्याच्या रंगत आहेत. त्यानंतर रागाच्या तावात अब्दुल सत्तार हे बैठकीतून निघून गेले. यावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी सत्तार ही एक विकृती असल्याची घाणाघाती टिका केला. “त्यांनी आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ केली आहे. पुढे आणखी कुणाकुणाला करतील ते दिसेलच,” असं अंबादास दानवे म्हणाले.

दरम्यान, दानवेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा देखील समाचार घेतला. शिवसेनेवरच्या ट्विटवर दानवे म्हणाले, त्यांनी काय-काय गमावलंय, पती मुख्यमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्रीपदावर आले आहेत अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे.

शिवसेना नाव आणि चिन्हावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘बस्स ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे नामही काफी है’, असं उत्तर त्यांनी चिन्ह आणि नावाच्या वादावर दिलं. याशिवाय यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. हे स्थगिती सरकार आहे. गुजरातला मदत करणारं सरकार आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत केली नाही,” असं दानवे म्हणाले.

Prakash Harale: