“…अशा व्यक्तींनी शिवसेनेला शिकवू नये”, अंबादास दानवेंचा नारायण राणेंवर निशाणा

नाशिक | Ambadas Danve On Narayan Rane – गुरूवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता. मराठी माणसाला हद्दपार करण्यामागे उद्धव ठाकरेंचाच हात आहे. त्यांनी मराठी माणसाच्या हिताचं बालू नये. गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना खोक्याच्या रूपात तूप खाल्लं, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. या टीकेवर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“ज्या व्यक्तीला उद्धव ठाकरे यांच्यामुळं मुख्यमंत्री पद मिळालं आणि ज्यांच्या मुलाला लोकसभेत शिवसेनेनंच पाडलं आहे. अशा व्यक्तींनी शिवसेनेला शिकवू नये”, असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं आहे. ते मनमाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. तसंच राज्यात सध्या पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किमान राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणीही दानवेंनी केली आहे.

पुढे अंबादास दानवे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पोलिसांना बोनस देण्याची मागणी केली होती. आता सत्तेत आल्यावर आपण केलेल्या वक्तव्याचा फडणवीस यांनी विचार करावा. काहींना असं वाटतं की शिवसेना संपली. मात्र, याच शिवसेनेला हरवण्यासाठी शिवसेनेतून आमदार फोडले, दिल्लीतून बढ्या नेत्यांना तुम्हाला बोलवावं लागलं. एवढंच नाही तर मनसेची देखील साथ तुम्हाला घ्यावी लागली. यावरून शिवसेना संपली नाही तर जिंकल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Sumitra nalawade: