प्रकाश सुर्वेंच्या मुलाने ‘तो’ व्हिडीओ डिलीट का केला? याची चौकशी झालीच पाहिजे दानवेंची मागणी

मुंबई : (Ambadas Danve On Prakash Surve) शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शीतल म्हात्रे या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हणाल्या हा माॅर्फ केलेला व्हिडिओ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UTB) पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप म्हात्रे यांच्याकडून करण्यात आहे. या संदर्भात आतापर्यंत पाच आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, शीतल म्हात्रे प्रकरणामुळे मुंबईसह राज्याभर राजकिय वातावरण तापलं आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून अधिवेशनातही खडाजंगी दिसून आली. एकीकडे शीतल म्हात्रे यांनी या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटावर आरोप केले आहेत. तर ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अधिवेशनात यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने तो व्हिडीओ डिलीट का केला? याची चौकशी झालीच पाहिजे असंही दानवे यांनी म्हंटलं आहे.

दानवे अधिवेशनात बोलताना म्हणाले की, ”एका आमदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. तर या प्रकरणात दोषी नसलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. हा व्हिडिओ मॉर्फ केला आहे की खरा आहे माहीत नाही परंतु आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजवरून डिलिट का केला. हा व्हिडिओ डिलिट का झाला याचाही तपास झाला पाहिजे असंही दानवे यावेळी म्हणाले आहेत.

मलाही तो व्हिडिओ आला मीही तो १० जणांना फॉरवर्ड केला. हा व्हिडिओ 32 देशात पहिला गेला. हा व्हिडिओ यूटूबवर 30 लाख लोकांनी पहिला. पोलिस विनाकारण लोकांवर कारवाई करतात. शिवाय पोलिसांनी त्या मुलाच्या फेसबुक व्हिडिओचा तपास करावा. त्या व्हिडिओमधून समजेल हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे हे समजेल असंही अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे.

Prakash Harale: