‘या’ प्रमुख मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचे आंदोलन; शिवसेनेचा पाठिंबा

औरंगाबाद : (Ambadas danave On State Government) गेली कित्तेक महिने स्पर्धा परीक्षेची तयारी करून भरती निघत नसल्याने प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांमध्ये रोष आहे. आपली सरकारकडून दखल घेण्यात यावी म्हणून औरंगाबादमध्ये अनेक तरूण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या नव्या निर्णयाला विरोध केला असून एनसीसीच्या मुलांना आगावीचे गुण देऊ नयेत, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान, या आंदोलनाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाठिंबा दिला असून आंदलोकांचे मत सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचे, त्यांनी आश्वासन दिले. औरंगाबादेत हे उमेदवार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस भरती प्रक्रियेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अधिक पाच गुणांची सवलत देऊ नये. त्यापेक्षा त्यांना विशेष राखीव जागा द्याव्यात अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

दानवे म्हणाले, “एनसीसीच्या विद्यार्थ्यांना राखीव जागा द्याव्यात. पण समान गुण मिळाल्यानंतर एनासीसीच्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे याबाबत काही ठोस उपाय करावा, अशी मागणी मी विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारकडे करणार आहे, असे अंबादास दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Prakash Harale: