“अहो जे.पी.नड्डा, जरूर पाहा हा खड्डा…”, ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत अंबादास दानवेंचा खोचक टोला

मुंबई | Ambadas Danve – लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका 2024 साली पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपनं लोकसभा मिशन 45 आणि विधानसभा मिशन 145 साठी कंबर कसली आहे. त्यासाठी काल (2 जानेवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P.Nadda) यांची चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये सभा पार पडली. मात्र, जे.पी.नड्डा यांचं भाषण सुरु होण्यापूर्वीच महिला सभेतून उठून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपला (BJP) खोचक टोला लगावला आहे.

जे.पी.नड्डा यांची औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा पार पडली. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं भाषण सुरू असतानाच काही महिला उठून गेल्या. हाच व्हिडीओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, “अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पाहा हा खड्डा… लोक आपलं भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं आहे. हे आज तुमच्याच साक्षीनं जनतेनं अधोरेखित करून टाकलं आहे”, असं दानवे म्हणाले.

पुढे जे.पी. नड्डा यांनी भाषणात बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा उल्लेख बाळासाहेब देवरस असा केला. यावरूनही अंबादास दानवेंनी टीकास्त्र सोडलं. “नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!,” असंही अंबादास दानवे म्हणाले.

Sumitra nalawade: