“जंगलात खूप राघू असतात पण…”, अमेय वाघचा सुमित राघवनला खोचक टोला

मुंबई | Amey Wagh On Sumit Raghvan – मराठी अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो. तसंत तो लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमेय वाघ नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतो. आता देखील तो चर्चेत आला आहे.

अमेय वाघने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. “जंगलात राघू खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी,” असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यासोबतच त्याने सुमित राघवनला (Sumit Raghvan) टॅगही केलं आहे. या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र या दोघांमध्ये वादाची ठिणगी निर्माण झाल्याचा संशय त्यांच्या चाहत्यांना येत आहे.

दरम्यान, यावर सुमित राघवननेही एक पोस्ट लिहीत त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी,” अशी पोस्ट लिहीत सुमितनं अमेयला टॅग केलं आहे. तसंच अमेय आणि सुमितनं केलेल्या पोस्टनंतर नेटकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sumitra nalawade: