“2019 मध्ये आपल्याला बहुमत मिळालं, पण यावेळी आपल्याला बहुमत नको…;” अमित शहा

कोल्हापूर : (Amit Shah On Uddhav Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते “मागील ९ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत आहोत. पण १२ लाख कोटींचा घोटाळा करणारी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी आमच्यावर एक पैशाचाही आरोप करू शकले नाहीत. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याची कुणाचीही हिंमत नाही.”

“२०१९ मध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींचा मोठा फोटो लावला होता. तर उद्धव ठाकरे यांचा लहान फोटो लावला होता. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत, असं तेही अनेकदा बोलले होते. मी आणि मोदींनीही अनेक ठिकाणी हेच बोललो होतो. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी आपल्या सर्व सिद्धांतांना मूठमाती देऊन ते शरद पवारांच्या चरणाजवळ जाऊन बसले,” अशा शब्दांत शाह यांनी हल्लाबोल केला आहे.

शाह पुढे म्हणाले, “भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच बनायला हवा होता. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. आम्ही सत्तेसाठी सिद्धांतांचा बळी दिला नाही. उद्धव ठाकरेंमुळे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी शरद पवारांच्या पायात जाऊन बसली होती. पण आता काळ बदलला आहे. खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपबरोबर आली आहे. आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आज त्यांना धडा शिकवण्याचं कामही झालं.”

“मागील लोकसभा निवडणुकीत आपण ४८ पैकी ४२ जागा जिंकलो होतो. आपल्याला बहुमत मिळालं होतं. पण यावर आपली संतुष्टी झाली नाही पाहिजे. यावेळी आपल्याला बहुमत नको आहे. संपूर्ण विजय हवा आहे. ४८ पैकी ४८ जागा भारतीय जनता पक्षाला मिळायला हव्यात,” असा निर्धार शाह यांनी व्यक्त केला.

Prakash Harale: