अमित शहांना संजय राऊतांनी डिवचले; म्हणाले…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात हिंदी भाषेवरुन मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. त्यात काल तामिळनाडूच्या शिक्षण मंत्र्यांनं हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त विधानं केलं. त्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता या वादामध्ये शिवसेनेनं उडी घेतली असून, खासदार संजय राऊतांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिलं आहे. शहांनी एक देश, एक संविधान आणि एक भाषा हे सूत्र लागू करण्याचं आव्हान स्विकारलं पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान करत हिंदी भाषा ही पाणीपुरीवाल्यांची भाषा आहे, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. मी आणि माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो. संसदेत मी हिंदीतच बोलतो. कारण देशाने माझे म्हणणे ऐकावे. हिंदी ही देशाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचा सन्मान व्हावा असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Prakash Harale: