“…तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”, अमित ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य!

मुंबई | Amit Thackeray’s Big Statement – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “गृहमंत्री पद दिले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करु”, असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं आहे. अंबरनाथमध्ये मनसेतर्फे संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्त्व्य केलं आहे.

अमित ठाकरे यांनी शुक्रवारी संवाद दौऱ्यानिमित्त मुंबई ते अंबरनाथ लोकल प्रवास केला. त्यानंतर त्यांनी अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. याच दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात मनसेला दोन पदे मिळणार असल्याची चर्चा सुरु असल्याबाबत पत्रकरांनी अमित ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अमित ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. “गृहमंत्री पद देणार असतील, तर सत्तेत सहभागी होऊ पण ते देत नाहीत ना”, असा मिश्किल टोलाही अमित यांनी लगावला.

दरम्यान, अमित ठाकरे यांनी 15 दिवसांत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसंच नवीन नेमणुका जाहीर केल्या. यानंतर अमित ठाकरे सात दिवसांसाठी कोकण दौऱ्यावरही गेले होते. या सात दिवसात त्यांनी तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे, महाविद्यालयीन तरुण -तरुणींशी संवाद साधला.

Sumitra nalawade: