नाशिक | Amit Thackeray’s Statement In Discussion – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. तसंच शिवसेना नेमकी कोणाची? यावरून उद्धव ठाकेर आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला वाद टोकाला पोहचला आहे. मात्र याबाबतच निर्णय आता सुप्रीम कोर्टातच होईल. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकारणावरुन मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
सध्याचं राजकारण बघता तरुणांनी राजकारणात यावं का? या प्रश्नावर, तर मी देखील राजकारणात आलोच नसतो, असं थेट उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं आहे. सध्या अमित ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पक्ष बाधंणीसाठी ते राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. नुकताच त्यांनी कोकण दौरा केला असून सध्या ते नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या मालेगावमधील विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.
तसंच या संकट काळात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मदत करणार का? या प्रश्नावर मात्र अमित ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं. याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील आणि त्यांच्या मताशी मी सहमत असल्याचं अमित ठाकरे म्हणाले. दरम्यान, अमित ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे मनसेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. .