मुंबई | Amitabh Bachchan – बाॅलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे ते हार्ड वर्किंग अभिनेते म्हणून ओळखले जातात. ते कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर शूटींगसाठी वेळेवर पोहतातच. तसंच आताही अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यातून त्यांचं हार्ड वर्किंग पुन्हा एकदा दिसून आलं आहे. सोबतच त्यांनी एका अनोळखी व्यक्तीसोबत बाईकवर प्रवासही केला आहे. याबाबतची खास पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे तर त्याच्या मागे अमिताभ बच्चन बसलेले दिसत आहेत. या अनोळख्या व्यक्तीनं अमिताभ यांना लिफ्ट दिली होती. त्यामुळे त्यांनी त्याचे आभार मानले आहेत. या फोटोला अमिताभ यांनी कॅप्शन दिलं आहे की, “या राइडसाठी धन्यवाद मित्रा.. मी तुला ओळखत नाही पण तू मला कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलंस. फास्ट आणि ट्रॅफिक जाम टाळून तू मला कामाच्या ठिकाणी पोहोचवलंस..कॅप, शाॅर्ट आणि पिवळा टी-शर्ट असा लूक असलेल्या या व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो.”
दरम्यान, सध्या अमिताभ बच्चन ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.